‘जालना बलात्कार प्रकरणी कुचकामी पोलिसांनाच सहआरोपी करा’

July 11, 2015 8:32 PM0 commentsViews:

jalna rape case11 जुलै : जालन्यामधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल त्यांनाच सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी होतेय. या प्रकरणी एका पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आलंय.पण यापेक्षाही कडक कारवाई पोलिसांवर झाली पाहिजे अशी मागणी होतेय. दोनवेळा बलात्कार करणार्‍या आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी आता पोलिसांनाच या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी काँग्रेस नेते सुबोध मोहिते यांनी केलेली आहे.

6 जुलैला रात्री 9 वाजता अल्पवयीन मुलगी आपल्या समवयस्क मित्रासोबत मंठा चौफुली परिसरातील कंकणेश्वर महादेव मंदीर परिसरात गेली होती. तिथे 2 टवाळखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करुन तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलीचा मोबाईल आरोपींनी स्वत: कडे ठेवून घेतला. घटनेच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी 7 जुलैला याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, आरोपी सापडले नाहीत.

याच काळात आरोपींनी पीडित मुलीच्या मोबाईलचा वापर करुन तिच्या आईच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि मुलीला भेटण्यास बोलविलं. त्याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता आरोपींना जेरबंद करण्यासाठी गुरुवारी 9 जुलैला सापळा रचण्यात आला. रात्री आरोपींना भेटण्यासाठी मुलीला पाठविण्यात आले पण पोलिसांना हुलकावणी देऊन मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान उड्डाणपूला जवळून आरोपीनी पीडित मुलीचे अपहरण केलं. तिच्यावर पुन्हा अत्याचार करून तासाभरानंतर तिला सोडून देण्यात आलं.

9 जुलैच्या मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान दोघापैकी एकाला रेल्वे स्थानक परिसरात तर दुसरा रेल्वेत बसून फरार होण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली. वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती न देता पवार यांनी अपयशी सापळा रचल्याने त्यांच्यावर निलंबनाची आणी चौकशीची कारवाई करण्यात आली. आज पीडित मुलीने कोर्टात जबाब दिल्यानंतर तिला तिच्या बहिणीसोबत तिच्या उत्तर प्रदेशातल्या गावात पाठवून देण्यात आलंय. पोलीस जर वेळेवर पोहचले असते तर ही घटना टळू शकली असती आणि आरोपी तेव्हाच ताब्यात आले असते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close