नाराज बाबासाहेब कुपेकरांची राज्य नियोजन मंडळावर वर्णी

November 30, 2009 1:27 PM0 commentsViews: 5

30 नोव्हेंबरराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचं सभापतीपद पुन्हा आपल्याला मिळावं यासाठी ते प्रयत्नशील होते. पण त्या जागी दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातही कुपेकरांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळेही ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आमदारपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र वसंत डावखरे यांनी मध्यस्थी करून बाबासाहेब कुपेकरांचं मन वळवलं होतं.

close