इतकी टीका होतेय तर स्वत:हून राजीनामा द्यावा, नानांचा चौहानांना सल्ला

July 11, 2015 9:15 PM0 commentsViews:

11 जुलै : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया अर्थात FTII आंदोलनाबद्दल अभिनेते नाना पाटेकर यांनी रोखठोक भूमिका मांडलीये. गजेंद्र चौहान यांचं योगदान मला माहित नाही, त्यांच्यावर एवढी टीका होतेय तेव्हा त्यांनीच स्वत:हून राजीनामा द्यावा असा सल्ला नानांनी दिलाय.

nana on ftiiआपण जर विद्यार्थ्यांना नको असेल तर तिथून बाहेर पडावं शेवटी विद्यार्थ्यांसाठीच काम करायचंय. त्यामुळे गलिच्छ स्वरूप येण्याअगोदर आपण पायउतार होणेच योग्य आहे असंही नाना म्हणाले. गजेंद्र चौहान यांच्याबरोबरच नानानी विद्यार्थ्यांचेही कान उपटले आहेत. संपामुळे कुणाचं भलं होतं नाही. संप करत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष्य केंद्रीत करावं आणि उगाच वेळ वाया घालवू नये अशा शब्दात नानांनी विद्यार्थ्यांना समजावले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close