गडचिरोलीत माओवाद्यांना मोठा धक्का, कोटमीमधल्या 9 माओवाद्यांचं आत्मसमर्पण

July 12, 2015 12:25 PM0 commentsViews:

xCJPqdI

12 जुलै : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाची मालिका सुरूच असून कंपनी कमांडरसह 30 लाखांचे बक्षीस असलेल्या तब्बल 9 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पण मालिकेने माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये बहुतांश जण हे कोटमी या माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातील आहेत. या गावात माओवाद्यांनी गेली कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ दिलेली नाही. पोलिसांतर्फे राबवण्यात आलेल्या या आत्मसमर्पण मालिकेला हळुहळू का होईना पण यश येत आहे.

पोलिसांचा वाढता जनसंपर्क आणि राज्य सरकारच्या आत्मसार्पण योजनेमुळे जिल्ह्यातील माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवडयात तब्बल नऊ माओवाद्यांनी आत्मासमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करणार्‍या माओवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक 4 चा सेक्शन कमांडर इरपा उर्फ प्रदीप एक्का याच्यासह आणखी 8  जणांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे 9 पैकी 7 जहाल नक्सली गटाने एकत्रितरीत्या पोलिस मदत केंद्र कोटमी मार्फतीने जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे आत्मसर्पण केले आहे. कोटमी इथल्या पोलीस मदत केंद्र फक्त चार महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले आहे. कोटमी हा माओवाद्यांचा बालेकिल्ला असून माओवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आखलेली रणनिती यशस्वी ठरली आहे. प्रदीपवर खुन जाळपोळीसह अठरा गुन्हे दाखल आहेत. 2007 मध्ये माओवादी चचळवळीत आलेल्या प्रदीपसह कंपनी क्र 4 ची सदस्य असलेल्या सिंधु या त्याच्या माओवादी पत्नीनेही आत्मसमर्पण केले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close