जेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

November 30, 2009 1:30 PM0 commentsViews: 95

30 नोव्हेंबर ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना 2009चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी तसचं हिंदी चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 26 जानेवारी 2010 अर्थात प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदीरात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 5 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. सुलोचना यांनी हा गौरव म्हणजे महाराष्ट्रात जन्मल्याचं सार्थक झाल्याचं म्हटलंय. मला मिळालेल्या भुमिकांनीच मी मोठी झाली आहे. हा पुरस्कार मिळाल्यावर सर्वात पहिल्यांदा मला माझे गुरु पेंढारकरांची आठवण झाली. ते असते तर त्यांना खुप आनंद झाला असता, अशा शब्दात त्यांनी ऋण व्यक्त केले आहेत. सुलोचनादीदींना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही आनंद व्यक्त केलाय. हा पुरस्कार खुप आधी मिळायला हवा होता. पण हरकत नाही 'देर हे अंधेर नही', असंही त्यांनी म्हटलंय.

close