विम्बल्डन महिला दुहेरी स्पर्धा जिंकून सानिया मिर्झानं रचला इतिहास

July 12, 2015 1:07 PM0 commentsViews:

379108-sania

12 जुलै : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने महिला दुहेरी विम्बल्डन स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. सित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने सानिया मिर्झाने ग्रॅडस्लॅम विजेतेपद पटकावले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानिया मिर्झाच्या या विजयाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.

विम्बल्डन महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा आणि मार्टिंना हिंगीसने विजय मिळवला आहे. विम्बल्डन पुरस्कार पटकावणारी सानिया पहिली भारतीय टेनिसपटू ठरली, तर मार्टिंना हिंगीसनेही तब्बल 17 वर्षांनी विम्बल्डनमध्ये बाजी मारली. सानिया मिर्झा-हिंगीसने मकरोवा-वेसनिनाचा 5-7, 7-6, 7-5 असा पराभव केला. पहिला सेट सानिया आणि मार्टिनानं गमावला होता. मात्र, दुसरा आणि तिसरा सेट त्यांनी छानच लढत दिली. 12 वर्षांपूर्वी व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण करणार्‍या सानियानं यापूर्वी मिश्र दुहेरीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र, विम्बल्डन जिंकण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close