‘ट्रान्सेंडन्स’ पुस्तकाचं प्रकाशन, विज्ञान आणि अध्यात्माचा संगम

July 12, 2015 6:29 PM0 commentsViews:

12 जुलै : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी यांनी लिहीलेल्या ‘ट्रांन्ससेंडन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी झालं..मुंबईच्या स्वामीनारायण मंदिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन झालं.. हे पुस्तक स्वामीनारायण संप्रदायचे प्रमुख स्वामी महाराज यांना एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते गुजरातच्या सारंगपूर गावात 20 जून रोजी देण्यात आले होते. प्रमुख स्वामी महाराज यांच्या सोबतच्या आठवणी डॉ कलाम यांनी या पुस्तकात आपल्या ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत. विज्ञान आणि आध्यात्म यांचा संगम झाला तर जगात शांतता आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल, तसच युवकांनाही प्रेरणा मिळेल असा संदेश या पुस्तकातून देण्यात आलाय. हे पुस्तक मराठीसह सात भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होत आहे. भारत सरकारचे वैज्ञानीक सल्लागार डॉक्टर आर चिदंबरम आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close