भ्रष्टाचारप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना अटक

November 30, 2009 1:52 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना अटक करण्यात आली आहे. साडेपाच हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. दुसर्‍यांदा नोटीस देऊनही कोडा हजर न झाल्याने इन्टेलिजन्ट डिपार्टमेटने त्यांना झारखंडमधल्या चाईबासा इथून अटक केली. कोडांच्या या भ्रष्टाचारात महाराष्ट्रातील काँग्रेसच्याही नेत्यांचा सहभाग असल्याची माहिती मध्यंतरी पुढे आली होती. मधू कोडांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कोडांची अटक म्हणजे नाटक असल्याची प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.

close