राणेचीं नाराजी सेनेच्या पथ्यावर

December 1, 2009 9:42 AM0 commentsViews: 2

1 डिसेंबर मुंबई महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी अंग काढून घेतल्याने काँग्रेसचा पराभव झाल्याचं आता समोर येतं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी काँग्रेस पक्षाने महसूलमंत्री नारायण राणे यांच्यावर टाकली. राणे यांनी या रणधुमाळीत आपला करिष्माही दाखवला. त्यामुळे शिवसेनेला आपलं नगरसेवक सांभाळण्याची कसरत करावी लागली. राणेंच्या करामतीमुळं ही निवडणूक काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचं चित्र निर्माण झालं. पण ऐन वेळेला राणे यांनी या निवडणुकीतून अंग काढून घेतल्याचं समजतं. काँग्रेसने विधान परिषदेसाठी राणे यांच्या पसंतीचा उमेदवार न दिल्याने राणे नाराज झाले. त्यामुळेच शिवसेनेच्या दोन्हीही बेपत्ता उमेदवार पुन्हा प्रकट झाल्या. शेवटच्या दिवशी मनसेनं तटस्थ भूमिका घेतली. अरूण गवळींची आखिल भारतीय सेना शिवसेनेच्या संपर्कात आली. विधान परिषदेवर कन्हैय्यालाल गिडवानी यांना संधी मिळावी अशी राणेंची इच्छा होती. पण काँग्रेसने भाई जगतापांना संधी दिल्याने राणे बिथरले. त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेसचा महापौर निवडणुकीत पराभव झाल्याची चर्चा आहे.

close