अधिवेशनाला वादळी सुरुवात, मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम

July 13, 2015 1:55 PM0 commentsViews:

pawasali adhivseshan213 जुलै : राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच वादळी झालीय. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम आहेत.

त्यासाठी आज सकाळीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानभवनाच्या आवारात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला आणि आंदोलनाला सुरुवात केली. पायर्‍यांवर बसून जोरदार घोषणाबाजीही केली.

दुबार पेरणी, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी,महिला बालकल्याण विभागाचा भ्रष्टाचार, बोगस डिग्री प्रकऱण,मुख्यमंत्र्यांचा अमेरिका दौरा या सगळ्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल कर्ज माफी देणार नाही अशी भूमिका घेतली होती, त्याचा आम्ही निषेध करतो, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close