अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी

July 13, 2015 2:18 PM0 commentsViews:

jui gadkari13 जुलै : ‘पुढचं पाऊल’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. एका अज्ञात व्यक्तीने जुईला पत्र लिहुन 20 जुलैला जीवे मारण्याची धमकी दिलीये. या प्रकरणी कर्जत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये.

8 जुलैला जुईच्या वाढदिवस होता. त्या दिवशी एका 10 वर्षांच्या मुलाच्या हातून हे धमकीचं पत्र पाठवण्यात आलं होतं. या पत्रात जुईला 20 जुलैला मारण्याची धमकी देण्यात आलीये.

“ही मस्करी समजू नका, जुई कुठे आहे ती आम्हाला माहित आहे. जर पोलिसांत खबर दिली तर घरतल्या सर्व लोकांना मारून टाकणार. आमची दुश्मनी जुईशी आहे, आम्ही जुईला मारणारच” अशी धमकी पत्रात देण्यात आलीये.

या धमकी पत्रामुळे खळबळ उडाली असून जुई गडकरीने कर्जत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीये. हे पत्र कुणी लिहलं कुठून आलं याचा पोलीस शोध घेत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close