कोल्हापूरात ताराराणी आघाडीचे सागर चव्हाण महापौर

December 1, 2009 9:49 AM0 commentsViews: 12

1 डिसेंबर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेस पुरस्कृत ताराराणी आघाडीचे सागर चव्हाण यांची निवड झाली. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे संभाजी देवणे यांची बिनविरोध निवड झाली. गेल्या महापौर निवडणुकीत नगरसेवकांचा घोडेबाजार बहरला होता. तो थांबविण्यासाठी महानगरपालिकेतील ताराराणी आघाडी आणि जनसुराज्य आघाडीत समझोता करण्यात आला होता. पण जनसुराज्य-राष्ट्रवादी आघाडीतील नगरसेवक निलेश देसाई यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यात समझोता होऊ शकला नाही. परिणामी बंडखोर नगरसेवक निलेश देसाई आणि ताराराणी आघाडीचे सागर चव्हाण याच्यात थेट लढत झाली. अखेर निलेश देसाई यांचा पराभव करत सागर चव्हाण यांनी बाजी मारली.

close