राहुल गांधींनी घेतली फेरीवाल्यांची भेट

July 13, 2015 12:22 PM0 commentsViews:

rahul gandhi 434313 जुलै : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम दिल्ली इथं फेरीवाल्यांची भेट घेतली. त्यांनी इथल्या स्टॉलधारक आणि फेरीवाल्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यात मुख्यत्वे गुजरातच्या फेरीवाल्यांचा समावेश होता. या फेरीवाल्यांनी राहुल यांना आपल्या समस्या बोलून दाखवल्या.

या समस्या सोडवण्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं. तसंच संसदेत हा विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या समस्या मांडणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.या अगोदरही राहुल गांधींनी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close