‘बाहुबली’ची दोनच दिवसांत रेकॉर्डब्रेक 100 कोटींची कमाई

July 13, 2015 4:40 PM0 commentsViews:

bahubali3413 जुलै : आजपर्यंतचा भारतीय सिनेसृष्टीत सर्वाधिक महागडा अशा बाहुबली सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. बाहुबलीनं अवघ्या दोन दिवसांमध्ये 100 कोटींची कमाई केलीये. आणखी परदेशातील कमाई बाकी आहे.

ख्यातनाम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी तब्बल दोन वर्ष अथक परिश्रमानंतर बाहुबली हा सिनेमा साकारलाय. या सिनेमात प्रभास, राणा डुगुबत्ती या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारलीये. एसएस राजामौली यांनी यापूर्वी ‘मगधीरा आणि ‘ईगा’ सारखे भव्य सिनेमे बनवलेले आहेत आणि त्यातल्या स्पेशल इफेक्ट्ससाठी नॅशनल ऍवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे. बाहुबलीमध्ये सुद्धा हायक्लास, अतिभव्य मनोरंजनाची सोय राजामौली यांनी केलेली आहे. हॉलिवूडच्या ‘300’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन’ची आठवण करुन असा हा बाहुबली आहे. पहिल्याच दिवशी बाहुबलीने 50 कोटींची कमाई करून इतिहास रचलाय. दक्षिणेत ठिकठिकाणी तिकीटांसाठी दोन-दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. तेलुगू, तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांमध्ये जगभरात तब्बल 4 हजार 200 स्क्रीन्समध्ये बाहुबली झळकलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close