मॅच फिक्सिंग ठपका, हिकेन शहाचं निलंबन

July 13, 2015 5:09 PM0 commentsViews:

hiken shah234513 जुलै : आयपीएलच्या आठव्या हंगामामध्ये मुंबई इंडियनकडून खेळणार्‍या मुंबईचा रणजी खेळाडू हिकेन शहावर बीसीसीआयनं निलंबनाची कारवाई केलीये. आयपीएलच्या आठव्या हंगामात मॅच फिक्स करण्याच्या आरोपावरुन हिकेन शहाचं निलंबन केलं गेलंय.

हिकेन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमकडून खेळतो. बीसीसीआयच्या अँटी करप्शन विभागानं चौकशीअंती हिकेन शहावर फिक्सिंगचा ठपका ठेवला होता. हिकेन शहानं मुंबईचाच प्लेअर प्रवीण तांबेला यावर्षी आयपीएल दरम्यान मॅच फिक्स करण्यासंदर्भात काही ऑफर दिली होती. यानंतर घडलेला प्रकार प्रवीण तांबेनं टीम मॅनेजमेंटला कळवला. त्यानंतर बीसीसीआयनं अँटी करप्शन विभागाची चौकशी नेमली होती. यानंतर आता हिकेन शहाला सर्व प्रकारामधून निलंबित केलं गेलंय. हिकेन शहानं फर्स्ट क्लास करिअरमध्ये मुंबईकडून 37 रणजी मॅच खेळल्या आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close