‘पंकजा…पंकजा…यस पापा…इटिंग चिक्की नो पापा,ओपन युअर माऊथ हा..हा..हा’

July 13, 2015 5:37 PM0 commentsViews:

13 जुलै : “पंकजा…पंकजा…यस पापा…इटिंग चिक्की नो पापा…ओपन युअर माऊथ हा…हा…विनोद विनोद…यस पापा…बोगस डिग्री नो पापा….लोणीकर लोणीकर…एस पापा…दोन बायका….हा हा हा…” हे कुठल्या शाळेतलं बालगीत नव्हतं तर अधिवेशनात विरोधकांनी ‘जॉनी जॉनी येस पापा’चं विडंबनच सादर केलं.

jonny jonny on pankja munde. सभागृहाच्या पायर्‍यावर विरोधक नेहमी ठिय्या देतच असतात. पण, यावेळी विरोधकांनी फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या घोटाळ्याची चांगलीच खिल्ली उडवलीये. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सभागृहाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी ‘जॉनी जॉनी येस पापा’चं विडंबनच सादर केलं. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा, शिक्षण मंत्री विनोद तावडे बोगस डिग्री प्रकरण, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची बोगस डिग्री आणि दोन पत्नी प्रकरणाची याचा विरोधकांना चांगलाच समाचार घेतला. “पंकजा…पंकजा…यस पापा…इटिंग चिक्की  नो पापा…ओपन युअर माऊथ हा…हा…विनोद विनोद…यस पापा…बोगस डिग्री नो पापा….लोणीकर लोणीकर…एस पापा…दोन बायका….हा हा हा…”असं गीत सादर करून सभागृहाचं दारच दणाणून सोडलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close