पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचं नेतृत्व

December 1, 2009 9:51 AM0 commentsViews: 3

1 डिसेंबर पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे मोहनसिंग राजपाल यांची निवड झाली आहे. राजपाल प्रथम शिख व्यक्ती पुण्याची महापौर झाली आहे. राजपाल यांनी शिवसेनेच्या दिपक गावडे यांचा पराभव केला. एकुण 144 नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालीकेत राजपाल यांनी 89 तर शिवसेनेच्या दिपक गावडे यांना 45 मतं मिळाली. राजपाल यांनी 44 मतांनी गावडेंचा पराभव केला. मनसेच्या 8 नगरसेवकांसह एकुण 10 नगरसेवक गैरहजर राहिले. तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे डब्बु आसवानी यांची निवड झाली आहे. यामध्ये योगेश बहल हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. ऐनवेळी भाजपच्या माऊली जाधव यांनी उमेदवारी मागे घेतल्याने बहल यांची बिनविरोध निवड झाली.

close