‘आदर्श’मधून चव्हाणांचं नाव वगळायचं का ?’

July 13, 2015 6:32 PM0 commentsViews:

asokh chavan  free13 जुलै : आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं आरोपी म्हणून नाव वगळता येण्याची विचारणा करण्यात येतेय. सुप्रीम कोर्टाने आज (सोमवारी) सीबीआयकडे ही विचारणा केलीये. आदर्श प्रकरणातून आपलं नाव वगळण्यात यावं अशी याचिका याअगोदरच अशोक चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टात केली होती.

आदर्श घोटाळ्या प्रकरणी आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, 4 मार्च रोजी मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती.

आदर्श घोटाळा खटल्यातून चव्हाणांचं नाव वगळण्यात यावं या मागणीसाठी सीबीआयने याचिका केली होती. मात्र चव्हाणांविरुद्ध खटला चालवायला राज्यपालांची परवानगी लागत असते. पण राज्यपालांनी सीबीआयला परवानगी नाकारली होती.

चव्हाण यांच्यावर कारवाईची परवानगी देण्यास राज्यपालांनी नकार दिल्यानंतर सीबीआयने चव्हाण यांचे नाव वगळण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. ती कोर्टाने नोव्हेंबरमध्ये फेटाळली होती. मात्र, या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा या मागणीसाठी खुद्द चव्हाणांनीच कोर्टात धाव घेतली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close