भरधाव टँकरचा भयानक अपघात सीसीटीव्हीत कैद

July 13, 2015 7:45 PM0 commentsViews:

13 जुलै : गुजरातमधल्या गोंध्रा इथं एका टँकरच्या चालकाचा ताबा सुटल्याने दोन तरूणांचा मृत्यू झालाय. रविवारी दुपारी हालोल टोल नाक्याजवळ ही घटना घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. gujrat tankurहे दोन दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी विरुद्ध बाजूला भरधाव आलेला टँकर अगोदर उभ्या ट्रकवर आदळला. त्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी टँकरचालकाने टँकर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला नेला, काही सेकंदातच हा टँकर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीस्वारांना चिरडून पुढे गेला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close