प्रधान समितीच्या फुटलेल्या अहवालाची सत्यता पडताळू – मुख्यमंत्री

December 1, 2009 10:13 AM0 commentsViews: 6

1 डिसेंबर राम प्रधान समितीच्या फुटलेल्या अहवालातल्या माहिती विषयीची सत्यता पडताळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील याविषयीचा निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आयबीएन-लोकमतने सोमवारी राम प्रधान समितीच्या अहवालविषयी गौप्यस्फोट केला होता. या अहवालात अनेक बड्या पोलीस अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच 26/11च्या वेळी यंत्रणेत सुसुत्रतेचा अभाव होता. असा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आला आहे.

close