…हे लोण महाराष्ट्रातही पसरू शकतं !

July 13, 2015 10:15 PM0 commentsViews:

13 जुलै : ऊस उत्पादक शेतकरी सर्वसाधारणपणे सधन मानला जातो..पण, कर्नाटकात हाच उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कर्नाटकात आतापर्यंत 14 ऊस उत्पादकांनी आत्महत्या केल्यात. म्हणूनच आत्महत्याचं हे लोण महाराष्ट्रात तर पसरणार नाही ना अशी चिंता आत्तापासूनच व्यक्त होतेय. कारण, महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरीही एफआरपी न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलाय.

karanatak caneहा आक्रोश आहे कर्नाटकमधल्या ऊस उत्पादक शेतकर्‍याच्या घरातला…36 वर्षांच्या शिवण्णानं आत्महत्या केली. शिवण्णा हे आत्महत्या करणारे पहिले ऊस उत्पादक नाहीत..आठवड्याभरा आधीच एका शेतकर्‍यांनी त्याच्या उभ्या पिकाला आग लावली आणि जळत्या पिकात उडी घेऊन आत्महत्या केली. तर एकानं किटकनाशक पिऊन जीवन संपवलं. गेल्या दोन आठवड्यात 14 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात.

उसाच्या किंमती रसातळाल्या गेल्यात, कर्जाचा बोजा वाढतोय आणि त्यात साखर कारखान्यांनी देणीही थकवलीत. कर्नाटकमधल्या साखर कारखान्यांनकडे 2013 पासून अडीच हजार कोटी थकबाकी आहे. आणि त्यांनी शेतकर्‍यांना आतापर्यंत एक रुपयाही दिलेला नाही. सावकाराकडून कर्ज घेऊन शेतकरी गुजरान करतायत आणि त्यासाठी व्याजाचा दर आहे 30 टक्के.

शेतकर्‍यांच्या हाती भरघोस पिकं हाती आलं…पण किंमती मात्र कोसळल्या. कर्नाटकातला ऊस उत्पादक शेतकरी आज ज्या संकटातून जातोय. महाराष्ट्र हळहळू त्या दिशेनं प्रवास करतोय. त्यामुळे आता गरज आहे ती राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्याची…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close