गोदातीरी सिंहस्थ कुंभपर्वाला सुरुवात

July 14, 2015 8:26 AM0 commentsViews:

mhahkumbha414 जुलै : 12 वर्षानंतर येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची सगळे भाविक वाट बघत होते अखेर आज हा सोहळा संपन्न झाला असून सिंहस्थ कुंभपर्वाला सुरुवात झालीये. “हर हर महादेव, गोदामैया की जय” च्या जयघोषात ध्वजारोहण सोहळा पार पडलाय.

सिंहस्थ कुंभमेळ्याची नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं ध्वजारोहणाने सुरुवात करण्यात आलीये. नाशिकच्या ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पालक मंत्री गिरीष महाजन, तसंच पुरोहित आखाड्याचे प्रमुख महंत उपस्थित होते. महायज्ञ झाल्यानंतर ध्वजाची विधीवत पूजा करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. साधू महंतांसोबतच लाखो भाविकही हा धर्मसोहळा बघण्यासाठी उपस्थित झाले होतं. या ध्वजारोहणानंतर साधुमहंतांच्या आखाड्यांतील ध्वजारोहण आणि पुरोहित संघाच्या वतीनं स्वतंत्र ध्वजारोहण केलं जाणार आहे.

तर, त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तिर्थावर धर्मध्वजाच्या रोहणाने कुंभपर्वाला सुरुवात झालीय. आज या ध्वजारोहणाच्या सोहळ्याकरता कुशावर्त तिर्थ सजविण्यात आलं होतं. कुंभपपर्वाच्या शुभारंभानंतर सर्व देवता आणि तिर्थ कुशावर्तात वास करतात अशी भाविकांची भावना आहे असा उल्लेखही पुराणात करण्यात आलेला आहे. म्हणून त्र्यंबकेश्वरमधील सगळा ब्राम्हणवृंद आणि भाविक कुशावर्त तिर्थांच्या स्नानासाठी आवर्जुन उपस्थित होते. आज त्र्यंबकेश्वर मधील ताम्रध्वजाचं रोहण पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर अवदेशानंदगिरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि सर्व सेवा आखाड्यांचे आचार्य आणि महंत उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close