रणजीत पाटील अडचणीत, लाचखोर मिलिंद कदम पाटलांचाच कर्मचारी !

July 14, 2015 9:06 AM0 commentsViews:

ranjeet patil 3314 जुलै : राज्यमंत्री रणजीत पाटील पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. लाचखोर मिलिंद कदम हा पाटील यांचाच कर्मचारी असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.

पाटील यांच्या कार्यालयात असणार्‍या मिलिंद कदम यांना 2 एप्रिलला 50 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली होती. पण, कदम हे आपल्या कार्यालयात कुठल्याही पदावर काम करत नव्हते तर केवळ आस्थापनावर काम करत होते, असा खुलासा रणजित पाटील यांनी केला होता. मात्र, मिळालेल्या कागदपत्रांनुसार कदम हे त्यांच्याच कार्यालयात काम करत होते असं स्पष्ट दिसतंय. त्याबाबतचे पुरावे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेत. या आधीही रणजित पाटील यांच्यावर दोन मतदार याद्यांमध्ये नावं असल्याचा आणि प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दडवल्याचा आरोप झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close