फियानग्रस्तांनी नाकारली सरकारची तुटपुंजी मदत

December 2, 2009 9:41 AM0 commentsViews: 6

2 डिसेंबरफियानग्रस्तांना सरकारने देऊ केलेली तुटपुंजी मदत आम्हाला नको असा नारा आता आपत्तीग्रस्तांनी लावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात अंशत:पडझड झालेल्या घरांना 500 रुपयांपासून ते 2 हजार चारशे रुपयांची मदत सरकारकडून मिळाली होती. विशेष म्हणजे हे मदतीचे चेक वटवण्यासाठी लाभार्थीना बँकेत खातं उघडण्यासाठी पाचशे रुपये खर्च करावे लागत आहेत. शिवाय काही ठिकाणी अजून पंचनामेही झाले नसल्यामुळे फियानग्रस्तांच्या सरकार बद्दलच्या नाराजीमध्ये आणखीनच भर पडली आहे. फियानग्रस्तांना सरकारने देऊ केलेली मदत आता आपत्तीग्रस्तांनी नाकारायला सुरुवात केली आहे. फियानं वादळाने अनेक जणांना बेघर केलं आहे तर कित्येक घरांची पडझड झाली आहे.

close