‘चिक्की घ्या, चिक्की…’ आव्हाडांनी विकली सभागृहात चिक्की !

July 14, 2015 3:45 PM0 commentsViews:

14 जुलै : पावसाळी अधिवेशनाच्या काल (सोमवारी) पहिल्या दिवशी विरोधकांनी सादर केलेली ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही विडंबन कवित्व चांगलीचं गाजली होती. तर आज विरोधकांनी गाजवली ती ‘चिक्की’… आज अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही विरोधकांनी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना टार्गेट केलं. पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी चक्क गळ्यात चिक्कीच्या माळा घालून आंदोलन केलं. इतकंच नाही तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिक्की विकून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. महिला आणि बालकल्याण खात्याने 206 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप झालाय. त्यामुळे विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close