वर्दीतला रिअल हिरो!, जीवाची पर्वा न करता वाचवले चौघांचे प्राण

July 14, 2015 5:48 PM1 commentViews:

14 जुलै : धुळ्यातील नगरपट्टी रस्त्यावरील एका न्यूज एजन्सीला काल (सोमवारी) सायंकाळी अचानक आग लागली. या दुर्घटनेत रमेश सिंह परदेशी या पोलीस अधिकार्‍याने स्वत:चा जीव धोक्यात घालून चौघांचे जीव वाचवले.

नगरपट्टी रस्त्यावर दिलीप खिवसरा यांची सर्कल न्यूज पेपर एजन्सी आहे. या एजन्सीचं खालच्या मजल्यावर कामकाज चालतं, तर दुसर्‍या मजल्यावर ते कुटुंबासह राहतात. सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एजन्सीमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू असताना एजन्सीच्या पुढच्या हॉलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली.

एजन्सीमध्ये वृत्तपत्रांची रद्दी, मासिके असल्यामुळे आगीने काही क्षणात पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली. काही वेळातच आग विझवण्यासाठी धुळे महापालिकेचे चार बंब दाखल झाले.

आग दुसर्‍या मजल्यावरदेखील पोहोचल्याने तिथे राहत असलेल्या खिवसरा कुटुंबीय घरातचं अडकून पडले होते. यावेळी आझाद नगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांना या घटनेची माहिती मिळताच ते सहकार्यांसह घटनास्थळी पोहचले. आणि आपल्या जीवाची पर्वाही न करता पोलीस निरीक्षक परदेशी आणि त्यांच्या सहकारी यांनी घरात घुसून एका पाठोपाठ एक करत चार जणांचे प्राण वाचवले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • SUNIL SHINDE

    VA RE VA BAHDUR MANANA PADEGA

close