ठाण्याचा गड राखण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

December 2, 2009 9:45 AM0 commentsViews: 1

2 डिसेंबरठाणे महानगरपालिकेत महापौरपद कायम ठेवण्यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 3 डिसेंबरला होणारी ठाणे महामगरपालिकेची निवडणूक चर्चेची बनली आहे. ठाण्यातल्या सगळ्याच नगरसेवकांना सेनेनं अज्ञात स्थळी ठेवलं आहे. तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेत फुटीचीही शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्याच्या महापौरपदी सेनेने आमदार एकनाथ शिंदे यांचे समर्थक अशोक वैती यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आमदार राजन विचारे यांचा गट नाराज आहे. विचारे यांच्यापेक्षा शिंदेचा गट अधिक मजबूत असल्यानेच मातोश्रीने हा आशीर्वाद दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या निवडणुकीनंतर ठाणे शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. ठाण्यातल्या शिवसेनेत सध्या दोन गट दिसत असले तरी महापौरपदाची माळ शिवसेनेच्याच गळ्यात पडेल अशी शक्यता आहे.

close