गजानन किर्तीकर शिवसेनेवर नाराज

December 2, 2009 9:57 AM0 commentsViews: 14

2 डिसेंबरगजानन किर्तीकर सध्या शिवसेनेवर नाराज आहेत. त्यांची नाराजी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे उघड केली आहे. पण प्रतिसाद मात्र थंड असल्याचं स्वत: कि र्तीकर सांगत आहे. त्यामुळेच ते मनसेकडे जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे. गजानन किर्तीकरांना विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळाल्याने ते नाराज होते. मात्र त्यांना विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची आशा होती. विधानपरिषदेची उमेदवारी रामदास कदम यांना देण्यात आल्याने त्यांची नाराजी वाढली आहे. आपलं लवकरात लवकर राजकीय पुर्नवसन करावं अशी मागणी किर्तीकरांनी सेना नेतृत्वाकडे केली आहे. किर्तीकरांनी मात्र मनसेत प्रवेश केल्याचं नाकारलं आहे.

close