ब्रेबॉर्नवर तब्बल 36 वर्षानंतर टेस्ट मॅच

December 2, 2009 10:18 AM0 commentsViews: 5

2डिसेंबर मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीअमवर तब्बल 36 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय मॅच होत आहे. भारत आणि श्रीलंका दरम्यानची तिसरी आणि शेवटची मॅच दोन डिसेंबरला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर रंगणार आहे. बर्‍याच कालावधीनंतर या मैदानावर आंतराष्ट्रीय मॅच होत असल्याने मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे. या मॅचसाठी स्टेडिअमही सज्ज करण्यात आलंय. ब्रेबॉर्न स्टेडियमचं पिचही बॅटींगला साथ देईल अशी आशा टीम इंडिया बाळगून आहे. त्यामुळेच क्युरेटर्सच्या शब्दानेही टीमला धीर आला आहे. त्यामुळे पिचबद्दलची उत्सुकता सगळ्यांना आहे. भारतीय टीमसाठीही ही टेस्ट महत्वाची आहे. कारण ही मॅच जिंकली तर भारतीय टीम टेस्ट क्रिकेट क्रमवारित नंबर एक होणार आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला टेस्ट मध्ये 13000 रन्स पूर्ण करायला अवघे 83 रन्स् हवेत. त्यामुळे घरच्या मैदानावर सचिन ही मजल मारतो का याची उत्सुकताही सगळ्यांना लागली आहे.

close