नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह : पोलिसांची विशेष गस्त

December 2, 2009 12:04 PM0 commentsViews: 2

2 डिसेंबर बुधवारपासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे. त्यासाठी नक्षलवाद्यांनी काही दिवस आधीपासूनच गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात पत्रकं वाटली. या सप्ताहात नक्षलवादी नवीन भर्ती करतात. त्यामुळे सध्या पोलिसांची या भागात विशेष गस्त आहे. गेल्या काही महिन्यांत गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी -पोलिसांमध्ये अनेक चकमकी झाल्या. त्यामुळे हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बनला आहे. त्यातच बुधवारपासून सुरू होणार्‍या नक्षल सप्ताहासाठी पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मीने बॅनर्स लावली आहेत. त्यामुळे पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.

close