‘वन रँक वन पेन्शन’साठी अण्णांचा एल्गार

July 15, 2015 5:28 PM0 commentsViews:

annaday

15 जुलै : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. माजी सैनिकांच्या ‘वन रँक वन पेन्शन’च्या मुद्द्यावरून अण्णा 2 ऑक्टोबरपासून दिल्लीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. अण्णा हजारेंनी राळेगणमध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले वन रँक वन पेन्शन’चं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर माजी सैनिकांच्या 28 संघटनांनी मिळून अण्णांची भेट घेतली. वन रँक , वन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी, यासाठी काही दिवसांपूर्वीच अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होतं. त्यानंतर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेमुदत उपोषण सुरू करण्यापूर्वी येत्या 26 जुलैला कारगिल विजय दिनानिमित्त राळेगणमध्ये शहीद पत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर महिनाभर या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यात येणार असून 2 ऑक्टोबर रोजी रामलीला मैदानावर अण्णा आमरण उपोषण करणार आहेत.

दरम्यान, दिल्लीत माजी सैनिकांनी मागच्या महिन्यात मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनात जवळपास 5 हजार निवृत्त लष्करी जवान सहभागी झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close