तासाभरानंतर मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्ववत

July 15, 2015 6:54 PM0 commentsViews:

ÃÖÖæߦü

15 जुलै : तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झालेली मुंबई मेट्रोची वाहतूक तासाभरानंतर पूर्ववत झाली आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून वाहतूक सुरू झाली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रोने दिली आहे.

अंधेरी ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे या स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मेट्रोची संपूर्ण वाहतूक तासाभरापूर्वी ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना समोरं जावं लागले. यावेळी खोळंबलेल्या मेट्रोमधील प्रवाशांना वैतागून थेट मेट्रोच्या रुळांवरून चालत जाऊन स्टेशन गाठावं लागलं.

दरम्यान, बिघाड लक्षात आल्यानंतर काहीवेळाने घाटकोपरकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close