श्रीलंकेच्या टेस्टच्या पहिल्या दिवशी 366 रन्स

December 2, 2009 1:16 PM0 commentsViews: 2

2 डिसेंबरभारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरी आणि शेवटची टेस्ट मॅच मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू आहे. पहिला दिवस संपला तेव्हा श्रीलंकेने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 366 रन्स केले आहेत. श्रीलंकेचे ओपनर्स दिलशान आणि पर्णवितरणानं मोठी पार्टनरशिप करत चांगली सुरूवात केली. पण त्यानंतर लंकेच्या सातत्यानं विकेट्स जात राहिल्या. दुसर्‍या सेशनमध्ये झटपट तीन विकेट घेत भारतीय बॉलर्सने वर्चस्व गाजवलं. भारताचा स्पीन बॉलर प्रग्यान ओझानं कॅप्टन कुमार संगकाराला आऊट करत श्रीलंकेला दुसरा झटका दिला. त्यानंतर दिलशान आणि जयवर्धनेने सावध खेळी करत स्कोर वाढवला. पण जयवर्धनेला आऊट करत श्रीसंतने ही जोडी फोडली. तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या समरवीराला हरभजनसिंगनं अवघ्या 1 रन्सवर पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. तिलकरत्ने दिलशानने जबरदस्त बॅटींग करत सीरिजमधली आपली दुसरी सेंच्युरी पुर्ण केली. हरभजन सिंगने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर प्रग्यान ओझानं 2 विकेट पटकावल्या. झहीर खान आणि श्रीसंतलाही प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

close