लेडी ड्रग माफिया बेबी पाटणकरला जामीन

July 15, 2015 9:07 PM0 commentsViews:

Baby patankar

15 जुलै : लेडी ड्रग माफिया बेबी पाटणकरला मुंबई सत्र न्यायालयाने आज (बुधवारी) जामीन मंजूर केला. पाच लाखांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झाला असून बेबी पाटणकरला जामीन मिळाल्याने मुंबई क्राईम ब्रँचला मोठा झटका बसला आहे.

मुंबई पोलिसांनी ड्रगमाफीया बेबी पाटणकरला 22 एप्रिल रोजी पनवेलमधून अटक केली होती. तिच्या अटकेच्या काही दिवसानंतर मुंबई पोलीस दलातील 5 पोलीस अधिकार्‍यांनाही याप्रकरणात अटक झाली. यामुळे पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली होती. मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या तपासात बेबीकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलं होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई पोलिसांसह संपूर्ण राज्यभरात खळबळ माजवणार्‍या बेबीची तब्बत 84 दिवसांनंतर सुटका झाली आहे. तब्बल 84 दिवसांत पोलिस बेबीविरोधात ठोस पुरावे सादर करु न शकल्याने तिची सुटका झाल्याचे समजते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close