महानगरपालिकेडूनच पूर नियंत्रणरेषेचं उल्लंघन

December 2, 2009 1:18 PM0 commentsViews: 2

2 डिसेंबर नाशिक महानगरपालिकेकडून नद्यांच्या पूरनियंत्रण रेषाचं उल्लंघन होत असल्याचं उघड होतंय. गोदावरी नदीच्या पूररेषेच्या पात्रात मातीचा भराव महानगरपालिकेकडून टाकला जात आहे. नदी पात्राच्या अवघ्या 100 मीटर अंतराच्या आतच नाशिक महानगरपालिकेने 18 मीटर रूंदीचा रस्ता बनवायला घेतला आहे. या रस्त्याच्या कामासाठी उपसण्यात आलेले मातीचे ढिगारे नदी पात्रात ढकलले जात आहेत. पण भविष्यात नदीला पूर आल्यास, त्याचा फटका नदीपात्रालगत राहणार्‍या रहिवाश्यांना बसणार आहे. विशेष म्हणजे नाशिक पाटबंधारे विभागाने पंधरा दिवसांपूर्वीच नद्यांच्या पूरनियंत्रण रेषा निश्चित केल्या आहेत.

close