बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले

July 15, 2015 9:36 PM0 commentsViews:

15 जुलै : तब्बल 36 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर तामिळनाडूच्या किनार्‍यानजीक बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध लागला आहे. रिलायन्स इन्डस्ट्रीजच्या पाणबुडीच्या मदतीने या विमानाचा शोध लावण्यात आलाय. विमानाचे अवशेष आणि कर्मचार्‍यांचे मृतदेह अखेर सापडले. बेपत्ता विमानाचे अवशेष आणि तीन कर्मचार्‍यांचे मृतदेह शोधण्यात यश आलंय. रोजचा सराव करत असताना आठ तारखेला तामिळनाडूच्या किनार्‍यावरुन हे विमान बेपत्ता झालं होतं. तेव्हापासून या विमानाचा शोध सुरु होता. अखेर रिलायन्स इन्डस्ट्रीजच्या पाणबुडीच्या मदतीने हे बेपत्ता विमान शोधण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close