नाशिक : हर्सूल धुमसतंय, जमावाने केली बस स्टँड परिसरात लुटालूट

July 16, 2015 10:47 AM0 commentsViews:

nashik harsul16 जुलै : नाशिकजवळच्या हर्सूल इथं पुन्हा तणाव निर्माण झालाय. हर्सूलमध्ये मंगळवारी दोन गटांमध्ये दंगल उसळली होती. बुधवारीही हा तणाव कायम होता. संतप्त जमावाने बुधवारी बस स्टँडच्या परिसरात लुटालूट करण्याचा प्रयत्न केला.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. तर जमावाच्या दगडफेकीत गेल्या दोन दिवसांमध्ये 65 पोलीस जखमी झालेत.

दंगलीचा फायदा घेत चोरट्यांनीही अनेक घरं आणि दुकांनांमध्ये लुटालूट केली. सर्व वरिष्ठ अधिकारी हर्सूलमध्ये दाखल झाले आहे. परिस्थिती आटोक्यात आण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. तर दुसरीकडे तणावाचा फायदा घेत दंगलखोरांनी हातात मिळेल ते सामान घेऊन घरं लुटली.

गावात राहण्याची लोकांना आता भीती वाटतेय. या दंगलीमुळे हर्सूलचे अनेक रहिवासी गाव सोडून निघून गेले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close