स्वाभिमान संघटनेच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार : एकाचा मृत्यू

December 3, 2009 10:50 AM0 commentsViews: 1

3 डिसेंबर मुंबई महानगरपालिकेवर पाण्यासाठी मोर्चा काढणार्‍या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात नीरज ढोलकीया या तरूणाचा मृत्यू झाला आहे. मोर्चेकरी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलीसांनी लाठीचार्ज केला. तसंच नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात 5जण जखमी झाले आहेत. त्यांना जी. टी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. जखमींमध्ये कालीदास कोळंबकर यांचा मुलगा प्रथमेश कोळंबकर ह्याचा समावेश आहे. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यात नागरिकांसोबतच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

close