आदित्य ठाकरेंची ‘ओपन जिम’ पालिका उखडून टाकते तेव्हा…

July 16, 2015 2:31 PM1 commentViews:

aditya gym16 जुलै : शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या ओपन जिमवरुन पालिकेचा चांगलाच गोंधळ उडालाय. आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन मुंबईत ओपन जिम सुरू केल्यात. पण, महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी जिमच उखडून टाकल्यात. पण, सेनेच्या नाराजीनंतर होत्या त्या ठिकाणी पुन्हा जिम लावण्यात आल्यात. पण, वॉर्ड ऑफिसरच्या चुकीमुळे जिम हटवल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी ट्विट करून केलाय.

त्याचं झालं असं की, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी (बुधवारी) मरीन ड्राईव्हवर मोठ्या थाटात ओपन जिमचं उद्घाटन केलं. बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेते डिनो मोरिया सारखे सेलिब्रिटीही यावेली आवर्जून उपस्थित होते. पण हा उद्घाटनाचा सोहळा संपतो नाही तोच पालिकेनं ओबेरॉय हॉटेलसमोर युवासेनेनं लावलेली ओपन जिम उखडून टाकली. या उखडलेल्या जिमचे फोटो प्रसिद्ध होताच युवासेनेचा चांगलाच गोंधळ उडाला. पण नंतर आदित्य ठाकरेंनी आपलं राजकीय वजन वापरताच उखडलेली जिम पुन्हा आहे त्याच जागेवर लावण्यात आली. संबंधीत अधिकार्‍याने जिम उखडल्याबाबत माफी मागितल्याचाही दावा आदित्यने केलाय. पण या निमित्ताने पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेतला सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आलाय. युवासेनेने मात्र उखडलेल्या जिमचं उद्घाटन झालंच नव्हतं असा दावा केलाय. थोडक्यात कुणाचं कुणाला ताळमेळ नाहीये हेच यावरून सिद्ध होतंय.

आदित्य ठाकरे यांनी काय ट्वीट केलंय ?

“जिम हटवल्याबद्दल महापालिकेच्या अधिकार्‍यांनी माफी मागितली. महापालिका पुन्हा जीम तिथेच लावणार आहेत. आमच्याकडे सर्व परवानग्या आहेत.”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shankar Bhadange

    what A Joke Really Mumbai Corporation unknown ,or that work had done purposefully ,& when when preshure occur then reform as it is

close