अजिंठा घाटात ट्रकच्या भीषण अपघातात 4 ठार

July 16, 2015 2:05 PM0 commentsViews:

truck accident3416 जुलै : औरंगाबादेतील अजिंठा घाटात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर आहेत. आज पहाटे अजिंठा लेणी जवळ असलेल्या घाटात सिमेंट आणि लाकडी बांबूच्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. धडक झाल्या झाल्या दोन्ही ट्रकनी पेट घेतला.

लाकडानं भरलेल्या ट्रक या आगीत जळून खाक झालाय. दोन्ही ट्रकमध्ये असलेल्या तीन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर एक जणाचा रुग्णालयात हलवताना वाटेत मृत्यू झाला. अजूनही तीन जण औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अपघात एवढा भीषण होता की, एकमेकात गुंतलेले ट्रक सोडवताना क्रेनचा वापर करावा लागला. या अपघातामुळे जवळपास दोन तास जळगाव औरंगाबाद रस्ता बंद झाला होता. आता रस्ता सुरळीत सुरू झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close