सोनसाखळी चोरी सीसीटीव्हीत

July 16, 2015 4:00 PM0 commentsViews:

16 जुलै :  कल्याणमधील टिळक चौकातील कासार हाट परिसरात एका वृद्ध महिलेचं मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आणि ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. बाईकवरुन आलेल्या दोन तरुणांनी या वृद्ध महिलेचं मंगळसूत्र खेचलं, त्या धक्क्यानं ही महिला खाली पडली. बुधवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देऊनही पोलीस चोरांना कैद करू शकत नाहीत, यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या 6 महिन्यांत कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणता चेन, मंगळसूत्र चोरण्याच्या घटना घडताहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close