नोटिसीनंतरही आंदोलन सुरूच ठेवणार, FTIIच्या विद्यार्थ्यांचा निर्णय

July 16, 2015 8:47 PM0 commentsViews:

FTII

16 जुलै : ‘फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थी आणि सरकारमध्ये निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी तातडीने संप मागे घ्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा एफटीआयआयतर्फे देण्यात आलेला असतानाही, विद्यार्थ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय आज (गुरुवारी) घेतला आहे. सरकारनं ताठर भूमिका न घेता, चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आता यावर संस्थेचे प्रशासन आणि सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थ्यांनी तातडीने संप मागे घेतला नाही, तर त्यांच्यावर संस्थेकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकेल, अशी नोटीस कालच एफटीआयआयचे संचालक डी.जे.नरेन यांनी काल (बुधवारी) विद्यार्थ्यांना पाठवली होती. यावर निर्णय घेण्यासाठी काल विद्यार्थ्यांची एक बैठक झाली. या बैठकीनंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आज (गुरुवारी) नोटिसीवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, चर्चा करण्यास तयार असल्याचंही म्हटलं आहे.

आम्हाला संस्थेतर्फे कारवाई करण्याचं नोटीस मिळणं ही अत्यंत दुर्देवी बाब असल्याचं सांगत, आम्ही कोणतंही बेकायदेशीर कृ त्य केलेलं नाही. त्यामुळे निलंबित करण्याचा प्रश्न कसा येतो, असा उलट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, आम्ही सरकारशी संवाद साधन्याचा प्रयत्न करतोय पण त्यांच्या तर्फे आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे आमच्या समोर कोणतीही पर्याय राहिलेला नाहीये असंही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close