मुख्यमंत्र्यांच्या ‘पेड न्यूज’ वर 45 दिवसांत करावई करा -भाजप

December 3, 2009 10:55 AM0 commentsViews: 4

3 डिसेंबर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या 'पेड न्यूज'वर प्रदेश भाजपनंही तक्रार केली आहे. 45 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास निवडणूक आयोगालाच कोर्टात खेचण्याचा इशारा भाजपने दिला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आठ महिन्याच्या कारकिर्दीवर प्रसिद्ध केलेल्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्या वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. 'द हिंदू' या वर्तमानपत्रातून ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी माहितीच्या अधिकाराखाली हा पेड न्यूजचा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानंतर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. आता प्रदेश भाजपनेही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देबाशिश चक्रवर्ती यांच्याकडे मुख्यमंत्री आणि नांदेडच्या निवडणूक अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंबंधी 45 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास निवडणूक आयोगालाच कोर्टात खेचण्याचा इशारा भाजपने दिला आहे. तर सुधाकर चव्हाण यांनीही शिवसेनेला पाठींबा दिला.

close