हरसूल दंगलीचं लोण पसरलं, ठाणापाड्यात समाजकंटकांनी केली लुटालूट

July 17, 2015 9:22 AM0 commentsViews:

nashik harsul17 जुलै : नाशिक जवळच्या हरसूल इथं पेटलेली दंगल शमलेली नसतानाच तिथून जवळच्या ठाणापाडा इथंही काही समाजकंटकांनी लुटालूट केलीये आणि काही घरांना आगही लावली. त्यामुळे या गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

आजुबाजुच्या परिसरातले तरुण येवून ही लुटालूट करत असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केलाय. संमाजकंटकांनी ठाणापाड्यातली एक बेकरी लुटून त्याला आग लावली.   अग्निशमन दलानं आग विझवली मात्र बेकरी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली.

पोलिसांचं विशेष पथक ठाणापाड्यात तळ ठोकून असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नाशिकला कुंभ मेळाव्याची सुरुवात झाली असताना सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचं काम काही समाजकंटक करत असून सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन करण्यात येतंय. ठाणापाड्यातल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. या छोट्या गावातल्या अनेक नागरिकांनी एका ठिकाणी आश्रय घेतला असून पोलिसांनी त्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था प्रदान केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close