काश्मीरमध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू

July 17, 2015 9:31 AM0 commentsViews:

kashmir flood417 जुलै : काश्मीर आणि उत्तराखंडला पावसाचा तडाखा बसलाय. काश्मिरमध्ये श्रीनगर-लेह मार्गावर सोनमर्गजवळ झालेल्या ढगफुटीमुळे एका जणाचा मृत्यू झालाय. तसंच तुफान पावसाने राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झालंय.

उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाने जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक रस्ते बंद झालेत. डेहराडून ते मसूरी मार्गाची अवस्था खराब आहे. पावसामुळे अमरनाथ आणि कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आल्यात. येत्या 36 तासात हवामान आणखी बिघडू शकतं असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील वर्षीही काश्मिरमध्ये ढगफुटीमुळे मोठी हानी झाली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close