कैगा किरणोत्सर्ग बाधा प्रकरणी कंत्राटी कामगार ताब्यात

December 3, 2009 11:09 AM0 commentsViews: 4

3 डिसेंबर कैगा अणुऊर्जा प्रकल्पातल्या किरणोत्सर्ग बाधेप्रकरणी पोलिसांनी एका कंत्राट कामगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमागे घातपात घडवण्याचा उद्देश होता का ? याचीही चौकशी त्याच्याकडून होणार आहे. काही दिवसांपूर्वी या केंद्रातल्या 55 कर्मचार्‍यांना पिण्याच्या पाण्यातून न्यूक्लिअर किरणोत्सारी पदार्थाची बाधा झाली होती. वॉटर कूलरमधल्या पाण्यात ट्रिटीयम हा किरणोत्सारी पदार्थ मिसळण्यात आला होता. हे काम प्रकल्पातल्याच कुणाचं तरी असावं, असाही अंदाज होता. याच प्रकरणी एका कंत्राटी कामगाराची चौकशी सुरु आहे.

close