जम्मू-काश्मीरसाठी 70 हजार ते 1 लाख कोटींचं महापॅकेज ?

July 17, 2015 1:34 PM0 commentsViews:

modi 5 sep speech17 जुलै : जम्मू-काश्मीरसाठी तब्बल 70 हजार कोटी ते 1 लाख कोटींचं महापॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.  रस्ते, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि पर्यटनाचा विकास आणि पूरग्रस्तांचं पुनर्वसनसाठी हे पॅकेज असणार आहेत. तसंच  नवं श्रीनगर आणि नवं जम्मू ही स्मार्ट शहरं उभारणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज जम्मु-काश्मीरमध्ये आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री गिरधारी लाल दोग्रा यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान जम्मूमध्ये जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोदी जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी 70 हजार कोटींचे विकास पॅकेजही जाहीर करतील, अशी शक्यता आहे. या पॅकेजअंतर्गत रस्ते, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि पर्यटनाचा विकास केला जाणार आहे. तसंच नवं श्रीनगर आणि नवं जम्मू ही स्मार्ट शहरं उभारणार आहे. त्याचबरोबर आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या शिक्षणसंस्था उभारण्यात येणार आहे. मोदींच्या उपस्थितीत जन्मशताब्दी समारंभ जम्मू विद्यापीठात होतोय. मोदींच्या दौर्‍यासाठी जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, मोदी यांच्या दौर्‍याआधीच पाकिस्ताननं सीमेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.

काश्मीरसाठी महापॅकेजचा कसा होणार वापर ?

- पुढच्या 5 वर्षांसाठी 70 हजार कोटी ते 1 लाख कोटी
- रस्ते, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि पर्यटनाचा विकास
- पूरग्रस्तांचं पुनर्वसन
- नवं श्रीनगर आणि नवं जम्मू ही स्मार्ट शहरं उभारणार
- आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या शिक्षणसंस्था उभारणार

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close