‘पाक खेळाडू नकोच’

July 17, 2015 2:31 PM0 commentsViews:

17 जुलै :  प्रो-कबड्डीचा दुसरा सीझन 18 जुलैपासून सुरू होतोय. नव्या सिझनच्या ट्रॉफीच गुरुवारी मुंबईत अनावरण करण्यात आलं. यावेळी आठही टीमचे कॅप्टन हजर होते. पहिल्या सिझनला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसरा सिझनही शानदार व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न करण्यात येतायत. यावेळी मोठ्या प्रमाणावर परदेशी प्लेयरही खेळतांना दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचाही समावेश असणार आहे. शिवसेनेनं मात्र, पाक खेळाडूंना विरोध केलाय. या सामान्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देण्यास शिवसेनेनं विरोध केलाय. कबड्डी हा महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ असला तरी आम्ही त्यात पाकिस्तांनी खेळाडूंना खेळू देण्यार नाही असं शिवसेनेचे वरळी विभाग प्रमुख आशिष चेंबुरकर सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close