ठाण्याचा गड सेनेने राखला

December 3, 2009 1:43 PM0 commentsViews: 1

3 डिसेंबर मुंबईपाठोपाठ ठाणे महानगरपालिकेचा गडही शिवसेनेने राखला आहे. गुरुवारी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अशोक वैती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नजीब मुल्ला यांचा पराभव केला. अशोक वैती यांना 63 मतं मिळाली. तर ही निवडणूक अवैध ठरवण्याची मागणी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतदानावर बहिष्कार टाकला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधीर बर्गे या एकमेव नगरसेवकाने नजीब मुल्ला यांना मतदान केल्याने त्यांना एक मत मिळालं. आरपीआय (इंदिसे गट), समाजवादी पार्टी आणि अपक्षांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला. नाराज झालेल्या राजन किणी आणि अनिता किणी यांनीही शिवसेनेच्या बाजूने मतदानात भाग घेतला. तर उपमहापौरपदावरही कब्जा करत शिवसेनेनं काँग्रेसलाही धक्का दिला. सेनेच्या मनोज लासे यांनी काँग्रेसच्या सुभाष खारकर यांचा पराभव केला. इथेही आघाडीने मतदानावर बहिष्कार घातला.

close