भोपाळ दुर्घटनेला 25 वर्ष पूर्ण : पीडित उपेक्षितच

December 3, 2009 1:49 PM0 commentsViews: 1

3 डिसेंबर भोपाळ गॅस दुर्घटनेला गुरुवारी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. पण अजूनही या घटनेतल्या पीडितांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 2 डिसेंबर 1984च्या मध्यरात्रीनंतर भोपाळमधल्या युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून मिथाईल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती झाली होती. त्यावेळी 8 हजार माणसांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या 25 हजारांवर गेली. तर पावणेसहा लाख लोकांवर विपरीत मानसिक आणि शारिरिक परिणाम झाले. या परिसरातल्या 30 हजार लोकांना अजूनही रसायन मिशि्रत दूषित पाणी प्यावं लागतंय. परिसराची स्वच्छताही झालेली नाही. विशेष म्हणजे पीडितांच्या पुनर्वसनासाठी आयोग स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा अजूनही कागदावरच आहे. इथले 50 हजार पीडित अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

close